मुकुट

किरिट असा तो बहाल करून गेला
झोपडीस माझ्या महाल करून गेला

किड्यामुंग्या परी का जगने असावे
बापजाद्यासं माझ्या सवाल करून गेला

भीक मागु नये हक्क घ्यावे हिरुन
संघर्षास ज्ञानाची ढाल करुन गेला

ताल ठोकुन आता लढतो असा मी
जीवनास माझ्या मशाल करून गेला

पेनही आता घाव घालतो मुळाशी
शाईस असा तो जहाल करून गेला

by dhirajkumar taksande

Comments (0)

There is no comment submitted by members.